“bailgadasharyat.com” ही वेबसाइट बैलगाडा शर्यतींबद्दलची माहिती आणि संसाधने एकत्रित करण्यासाठी तयार केली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील या ऐतिहासिक शर्यतीला सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे. आमचं उद्दिष्ट आहे की लोकांपर्यंत या शर्यतींचे महत्व पोहचवणं आणि या खेळाचा, शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या मेहनतीचा आदर करणे.
आमच्या कार्याची भूमिका:
बैलगाडा शर्यतींचा इतिहास, त्यांच्या आयोजनाच्या पद्धती, आणि त्या शर्यतींमध्ये भाग घेणाऱ्यांचे योगदान.
या खेळात सहभागी शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या बैलांचा गौरव.
महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये होणाऱ्या शर्यतींची माहिती आणि त्यांचा उत्सव.
शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या मेहनतीचे महत्त्व जागरूक करणे.
आम्ही या वेबसाइटद्वारे बैलगाडा शर्यतींसाठी एक एकत्रित मंच तयार करत आहोत जिथे लोक एकत्र येऊन या परंपरेचा अनुभव घेऊ शकतील आणि त्याला नवा आकार देऊ शकतील.